जिल्ह्यात मेळघाट मधील 100% आयुष्मान भारत कार्ड काढणारी प्रथम ग्रामपंचायत मोथा (मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान)

 जिल्ह्यात मेळघाट मधील 100% आयुष्मान भारत कार्ड काढणारी प्रथम ग्रामपंचायत मोथा

Ayushman-card-gp-motha
Ayushman-bharat-golden-card

            मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत आज दि.29/12/2025 रोजी सकाळी 10.20 दोन्ही (मोथा/मडकी) गावातील उर्वरीत 5 लोकांचे आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढुन 100% झाल्याचे ग्रामपंचायत आपले सरकार सेवा केंद्राद्वारे घोषीत करण्यात आले. 

*तपशील*

*गाव- मोथा* अपेक्षित एकूण टार्गेट - 1047 (रेशनकार्ड नुसार)

- अभियान आधी काढलेले कार्ड - 725

- आधार अपडेट नसलेले - 10

- मृत्यू झालेले              - 9

- कार्यक्षेत्रा बाहेर           -  16

- पोर्टलवर उपलब्ध नसणारी नावे - 18

- अभियान कालावधीत काढलेले कार्ड - 269

#एकूण  = 1047 (मोथा 100%)यादी पाहण्या करिता ( येथे क्लिक करा ) 


*गाव - मडकी*

अपेक्षित लोकसंख्या - 539 (टार्गेट रेशनकार्ड नुसार )

- अभियान आधी झालेले 448

- अभियान कालावधीत काढलेले - 44

- पोटलवर उपलब्ध नसणारी नावे - 14

- आधार अपडेट नसणारे - 10

- लग्न झालेले            - 3

- कार्यक्षेत्राबाहेर         - 18

- चुकीची नावे            -2

#एकूण  = 539 (मडकी 100%) यादी पाहण्या करिता( येथे क्लिक करा )

    ग्रामपंचायत ऑपरेटर श्री.सुनिल सुरेश चव्हाण, श्रीमती.शेवंता नामदेव शेळके (आशा सेविका मोथा), सौ.राते संजु धांडे (आशा सेविका-मडकी) यांच्या उत्स्फूर्त समन्वयाने हे सिद्ध झाले.

        याच कार्याची दखल घेऊन मा.सौ विमल धांडे (सरपंच), मा.श्री साधुरामजी पाटील (उपसरपंच), व ग्रामपंचायत अधिकारी कु.मनिषा सिरसाट यांनी ग्रा.पं. ऑपरेटर व आशा सेविका यांचा सत्कार शॉल व पुष्पगुच्छ देऊन केले. करिता सर्व गावकऱ्यांचे व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे अभिनंदन. आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढलेल्या दोन्ही गावाच्या यादी ग्रामपंचायत च्या ऑफिशियल वेबसाईट https://gpmotha.blogspot.com/   प्रसिध्द करण्यात आली आहे.

Ayushman-card-gp-motha



         या अभियान अंतर्गत आयुष्मान भारत कार्ड 100% टक्के करण्यात सहकार्य करणा-या प्रत्येक गावक-यांचे व कर्मचा-यांचे आपले सरकार सेवा केंद्र व ग्रामपंचायत कार्यलय मोथा च्या वतीने मन पुर्वक आभार.......

ayushman-card-camp


0 Comments